आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI And Rajasthan Royals Dispute News In Marathi

बीसीसीआय- राजस्थान रॉयल्सच्या वादावर पडदा; शिल्पा आणि राज कुंद्रा दंड भरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघात सुरु असलेल्या मालकी हक्काच्या वादावर आज (गुरुवारी) अखेर पडदा पडला. दोन्ही पक्षांनी कोर्टाबाहेरच वादावर तोडगा काढला आहे. राजस्थान रॉयल्सने एक कोटी दंड भरण्यास तयारी दर्शवली आहे.

2008 मध्ये आयपीएलच्या संघातील क्रिकेटपटूंचा लिलाव सुरु असताना अमेरिकेतील कंपनी इमरजिंग मीडिया (आयपीएल) लिमिटेडने 6.7 कोटी डॉलरमध्ये 10 वर्षांसाठी राजस्थान संघाची फ्रेन्चाइजी खरेदी केली होती. एवढेच नाही तर बीसीसीआयला कोणतीही पूर्वसुचना न देता राजस्थान संघाने जयपूर आयपीएल क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडला काही शेअर विकले होते. बीसीसीआयला याबाबत माहिती मिळाल्यानंतर एप्रिल 2010 मध्ये मुंबई हायकोर्टात रॉयल्स विरूद्ध याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, मालकी हक्कावरून आयपीएलमधील दुसरा संघ किंग्ज इलेवन पंजाबसोबतही बीसीसीआयचा वाद सुरु होता. मात्र, बीसीसीआयने 2012 मध्ये हा वाद कोर्टाबाहेरच सोडविला होता. किंग्ज इलेवनवरदेखील एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. यापूर्वी बीसीसीआयने पुणे आणि कोच्ची संघासोबत सुरु असलेल्या वाद सामंजस्याने सोडविला होता.

राजस्थान रॉयल्सने आता आयपीएल-7 वर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.