आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Appoints HDFC's Deepak Parekh As Special Advisor For IPL News In Divya Marathi

आयपीएल : विशेष सल्लागारपदी पारीख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीसीसीआयचे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले हंगामी अध्यक्ष सुनील गावसकर यांनी आज दीपक पारीख यांची आपले विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली. 2014च्या आयपीएल हंगामात पारीख यांना गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीलाही विशेष निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आले आहे.

हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे चेअरमन असलेल्या दीपक पारीख यांना 2006मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

उद्योगविश्वात मानाचे स्थान असणार्‍या दीपक पारीख यांनी आपल्या विनंतीचा मान ठेवून आपला प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल सुनील गावसकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांचा अनुभव आणि ज्ञान यांचा बीसीसीआय-आयपीएलला प्रचंड लाभ होईल, असेही मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे. नियुक्ती केल्याबद्दल आभार व्यक्त करताना दीपक पारीख यांनी या जबाबदारीबरोबरच अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार असल्याचे म्हटले आहे.

सुंदररामन यांना हटवण्यासाठी नवी ‘खेळी’
न्यायालयाने आयपीएलचे वादग्रस्त सीईओ सुंदररामन यांच्या आयपीएल 2014मधील अस्तित्वाबद्दल निर्णय सुनील गावसकर यांनी घ्यावा, असे सुचवले होते. मात्र, गावसकर यांनी रामन यांच्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे रामन यांना अडगळीत टाकण्यासाठीच ही नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.