आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Appoints HDFC's Deepak Parekh As Special Advisor For IPL News In Divya Marathi

गावसकर-पारेखच्या जोडीमुळे आशा वाढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनील गावसकर यांच्या आग्रहामुळे एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांना आयपीएल-7 गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सामील करण्याची माहिती अनेकांना नव्हती. मला त्यांच्या नियुक्तीचे आश्चर्य वाटले नाही. कारण ही वेळेची मागणी होती. पारेख फक्त टेक्नोक्रेट नसून ते जबरदस्त क्रिकेटप्रेमीसुद्धा आहेत. यामुळेच त्यांनी याला मान्यता दिली.

दोन आठवड्यांपूर्वी गावसकर यांना बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष बनवण्यात आले त्या वेळी मी म्हटले होते की, गावसकर यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला आहे, हे वाचकांच्या लक्षात असेल. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये बदल करून ते स्वत:ला सिद्ध करू शकतील. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला आर्थिक प्रकरणावर आता निर्णय घेताना अडचण येऊ नये. कारण त्यांच्याकडे दीपक पारेखच्या रूपाने आर्थिकप्रकरणी निर्णय घेऊ शकणारे तज्ज्ञ आहेत. गावसकर स्वत: 2008 ते 2010 पर्यंत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य राहिलेले आहेत. गावसकर यांनी त्या वेळी पद सोडले, कारण या कामात वेळ जायचा. मात्र, आर्थिक फायदा होत नव्हता. कोणत्याही सदस्याला कोणतेच मानधन मिळत नव्हते. आयपीएलमध्ये सुधारणेसाठी मोठा कालावधी पाहिजे, असे त्या वेळी गावसकर यांनी म्हटले होते. पारेख यांचा इतिहास खेळाशी संबंधित नाही. मात्र, आर्थिक प्रकरणे हाताळण्यासाठी किंवा इतर प्रकरणांसाठी एखादा खेळाडू असणे गरजेचे नाही. खेळाडूसुद्धा असे प्रकरण कुशलतेने सांभाळू शकणार नाहीत. थोड्याफार बदलाने आयपीएलवर अचानक विश्वास बसेल, असेसुद्धा नाही. हो, स्पर्धेच्या संचालनात पारदर्शकता आणि विशेषज्ञता वाढेल, असे म्हटल्या जाऊ शकते. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणांमुळे चाहत्यांचा या स्पर्धेवरून विश्वास कमी झाला असून बर्‍याच शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत, यात शंकाच नाही.

मी विशेषत: मागच्या वर्षी घडलेल्या घटनांची आठवण करू इच्छितो. त्या वेळी स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या तीन खेळाडूंवर आजीवन बंदीची शिक्षा जाहीर झाली आणि बरेच वरिष्ठ अधिकारीसुद्धा शंकेच्या चक्रात अडकले. या घटनेमुळे भारतीय क्रिकेटच्या प्रमाणिकपणावरून विश्वास उडाला. आश्चर्य म्हणजे इतक्या घडामोडी होत असताना भ्रष्टाचारविरोधी संघटना कुंभकर्णासारखी झोपेत होती. त्यांना काहीच माहीत नव्हते. दीपक पारेख आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलतात, हे बघावे लागेल.

आता गावसकर यांना दीपक पारेखसारख्या अर्थतज्ज्ञाची मदत मिळणार आहे. गावसकर-पारेख यांच्या जोडीमुळे आयपीएलचे कल्याणच होईल, अशी आशा आहे. कारण दोघेही स्वच्छ प्रतिमेची व्यक्तिमत्त्वे आहेत.