आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Appoints Kings Xi Punjab Coaches For Dhoni And Team India

भारतीय संघाच्‍या मदतीला \'मराठवाड्याचा बांगर\' धावला, जाणून घ्‍या त्‍याच्‍या यशाची ‘पंचसूत्री’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर)
औरंगाबाद : संजय बांगर मूळचा औरंगाबादचा क्रिकेटपटू. सेंट फ्रान्सिस शाळेत शिक्षण घेताना शेख हबीब, इक्बाल सिद्दिकी या आपल्या बालमित्रांसमवेत त्याने शहरातील सर्व क्रिकेटची मैदाने गाजवली. संजय बांगरची भारतीय क्रिकेट संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्याच्या यशाची पंचसूत्री त्याचा जिवलग मित्र शेख हबीब यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितली.
ही आहे पंचसूत्री
गंभीर व्यक्ती

संजय बांगर हा स्वभावाने अत्यंत गंभीर व्यक्ती आहे. तो प्रत्येक काम सीरियसली करतो. कोणत्याही कामाला तो सहज घेत नाही. एकदा एखादे काम हाती घेतले की ते तडीस नेतोच, असा त्याचा स्वभाव आहे.
टीमवर्क
संजय नेहमी उत्तम टीमवर्कवर जोर देतो. एकटा खेळाडू एखाद्या वेळी चमत्कार करू शकेल. मात्र, संघातील सर्वांनी टीमवर्कने खेळ केला तर मग अडचणीच्या काळातही मार्ग सापडतो, असे त्याचे मत आहे.
प्रामाणिक आणि कामात समर्पण
बांगर आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. त्याला जे काम आवडते, त्यात तो झोकून समर्पणाने कार्य करतो. परिणामाची चिंता तो करीत नाही. आपले कार्य सातत्याने करण्यावर जोर देतो.
मदतीसाठी तत्पर
संजय इतरांना मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. क्रिकेट असो वा क्रिकेटच्या बाहेरचे जग. त्याच्या परीने ज्याला जितकी मदत करता येईल, ते तो करतो. त्याचा स्वभावच तसा आहे. संजयच्या मदतीमुळेच औरंगाबादच्या राजेंद्र पवारला रेल्वेत नोकरी मिळाली.
पाय जमिनीवर
कितीही यश मिळाले तरीही संजय बांगरचे पाय जमिनीवरच असतात. यश त्याच्या डोक्यात जात नाही. तो ‘डाऊन टू अर्थ’ असा व्यक्ती आहे. यामुळे तो प्रत्येकाला अत्यंत सामान्य व्यक्ती वाटतो. संजयसोबत संवाद साधताना खेळाडूंना पटकन आपलेपणा वाटू लागतो.
*संजय बांगरचा जन्म 11 ऑक्टोबर 1972 रोजी पाटोदा (बीड) येथे झाला. त्याचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण औरंगाबादच्या सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये झाले. शालेय वयातच संजयने क्रिकेटचा श्रीगणेश केला.

*बालमित्र शेख हबीब, इक्बाल सिद्दिकीसोबत क्रिकेटचे मैदान गाजवले. संजयचे वडील बापूसाहेब बांगर औरंगाबादच्या सिटी सर्व्हे कार्यालयात कार्यरत होते.

* खोकडपु-यातील शिवाजी हायस्कूलसमोर संजय बांगरचे घर होते. शिवाजी हायस्कूलच्या मैदानावरच त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात झाली.

* इंग्लंडविरुद्ध 3 ते 6 डिसेंबर 2001 या काळात मोहाली कसोटीत संजय बांगरने कसोटी पदार्पण केले. औरंगाबादचे क्रिकेट मार्गदर्शक किरण जोशी यांनी संजय बांगरला क्रिकेटचे बाळकडू दिले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबच्‍या संघासमवेत बांगर आणि श्रीधर