आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bcci Appoints Ravi Shastri And Sanjay Bangar As Coaching Staff News In Marathi

लाजीरवाण्या पराभवानंतर BCCI ची कारवाई, 2 विदेशी कोचना विश्रांती, शास्‍त्री संचालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - रवी शास्‍त्री)
मुंबई - इंग्‍लविरुध्‍द लाजीरवाण्‍या पराभवानंतर BCCI ने माजी कर्णधार रवी शास्त्री यांची आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संचालकपदी निवड केली आहे. BCCI ने प्रसिध्‍दी पत्रकात दिलेल्‍या माहितीनुसार प्रशिक्षक डंकन फ्लेचर कायम राहणार असून रवी शास्‍त्री भारतीय संघाला केवळ मार्गदर्शन करणार आहेत.
भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेवर पॅनी आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक डॉवेस यांना आगामी एकदिवसीय मालिकेमध्‍ये 'आराम' दिला आहे. त्‍यांच्‍याऐवजी माजी अष्‍टपैलू खेळाडू संजय बांगर आणि भारत अरुण यांना सहायक प्रशिक्षक म्‍हणून नेमण्‍यात आले आहे. माजी फिरकीपटू आर. श्रीधर यांना संघाच्‍या सपोर्ट स्‍टापमध्‍ये सहभागी करुन घेतले आहे.
2007 मध्‍ये विश्‍वचषकात भारताने अत्‍यंत लाजीरवाणा पराभव पत्‍करला होता. पराभवातून सावरण्‍यासाठी रवी शास्‍त्रींची संघाच्‍या मुख्‍य व्‍यवस्‍थापकपदी नेमणूक करण्‍यात आली होती.
भारताचे अष्‍टपैलू खेळाडू संजय बांगर यांनी आयपीएलच्‍या सातव्‍या पर्वामध्‍ये किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबचे प्रशिक्षक म्‍हणून भूमिका पार पाडली आहे.