लंडन - खेळाडूंना प्रवासामध्ये फॉर्मल ब्लेझर आणि शर्ट-पॅंट ऐवजी टी-शर्ट आणि ट्रॅक पॅंट वापरता यावा तसेच विमान प्रवासामध्ये इकॉनॉमी क्लास ऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करता यावा या भारतीय क्रिकेटपटूंच्या मागण्यांना बीसीसीआयने हिरवा झेंडा दशिविला आहे.
भारतीय क्रिकेटपटू अन्य खेळाडूंपेक्षा श्रीमंत आहेत. परंतु इंग्लड दौ-यापूर्वी हे इकॉनॉमी रेटमध्ये विमानप्रवास करत होते. तर 5-6 तास प्रवासामध्ये पुर्वी ब्लेझर आणि ट्राउझर व शर्ट परिधान करत होते. त्यामुळे त्यांना प्रवास आरामदायी होत नव्हता. या सर्व गोष्टीचा विचार करुन BCCI ने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
BCCI सचिव संजय पटेल यांनी म्हटले, की खेळाडू आता प्रत्येक ठिकाणी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करु शकतील. आपण हे विसरुन चालणार नाही की, बीसीसीआयची सारी उपलब्धता ही खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनामुळेच आहे.
(फोटोओळ - पत्नी साक्षी समवेत महेद्रसिंग धोनी)
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा, भारतीय संघाचा कॅज्युअल फॉर्ममधील अंदाज...