आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bcci Bans Cricketers Wives On Tours News In Marathi

पत्‍नीला सोबत ठेवण्‍यासाठी पाकिस्‍तानी क्रिकेटपटू अक्रमने घातला होता वाद,पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - पत्‍नी हुमासोबत वसीम अक्रम)
कसोटीमध्‍ये इंग्‍लंडबेराबर 3-1 असा मानहाणीकारक पराभ्‍ाव स्विकारल्‍यानंतर बीसीसीआयने भारतीय संघ व्‍यवस्‍थापनात बदल केले. खेळाडूंना विदेशी दौ-यावर प्रेयसी किंवा पत्‍नींना सोबत नेता येणार नसल्‍याचा नियम केला. परंतु पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने पत्‍नीला विदेश्‍ा दौ-यावर नेण्‍यासाठी पाकीस्‍तानी क्रिकेट बोर्डासोबत वाद घातला होता.

अक्रमने घातला होता वाद
वसीम अक्रम पत्‍नी हुमावर अतीव प्रेम करायचा. त्‍या प्रेमाखातर त्‍याने पाकिस्‍तान क्रिकेट नियामक मंडळाशी वाद घातला होता. त्‍यावेळी पाकिस्‍तानी खेळाडूंना बायकांना सोबत विदेश दौ-यावर सोबत घेवून जाण्‍याची परवानगी नव्‍हती.

पत्‍नीला आलमारीमध्‍ये लपवले
पाकिस्‍तानाचा माजी फिरकीपटू सकलॅन मुश्‍ताकने 2011 च्‍या एक मुलाखतीमध्‍ये सांगितले होते की, '1999 च्‍या विश्‍वचषकामध्‍ये पत्‍नी सनाला त्‍याने हॉटेलमध्‍ये नेले होते. याचे वृत्‍त प्रसार माध्‍यमांनी दिले होते. त्‍यामुळे पीसीबीचे मंडळ खेळाडूंच्‍या खोल्‍या चेक करायला आले होते. त्‍यावेळी कारवाईच्‍या भीतीने मुश्‍ताकने पत्‍नी सनाला आलमारीमध्‍ये लपवले होते'.
अश्‍लील नृत्‍य पाहायला गेले होते खेळाडू
गेल्‍या वर्षी झिम्‍बॉब्‍वेच्‍या दौ-यावर असताना पाकिस्‍तानी खेळाडू जुनैद खान, अन्‍वर अली आणि अली असद लाहोर थिएटरमध्‍ये महिलांचे अश्‍लील नृत्‍य पाहण्‍यासाठी गेले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विदेश दौ-यावर पत्‍नी/गर्लफ्रेंड सोबत क्रिकेटपटू