आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयची रविवारी तातडीची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल घोटाळ्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निरीक्षणानंतर खडबडून जाग आलेल्या बीसीसीआयने येत्या रविवारी आपल्या कार्यकारिणीची तातडीची बैठक आयोजित केली आहे. मुंबई येथील मुख्यालयात प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.

16 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना मुदगल समितीने आपल्या अहवालात अनेक गंभीर बाबींची नोंद केल्यानंतरही काहीही कृती न केल्यासंदर्भात फटकारले होते. मात्र, त्याच वेळी न्यायालयाने सीबीआय किंवा अन्य संस्थांकडे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यापेक्षा बीसीसीआयने स्वत:च अंतर्गत चौकशी करून सत्य बाहेर काढावे, असे म्हटले होते. त्यामुळे त्यासंदर्भात पुढील कृती करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीतील निर्णयावरही आता सर्वांची नजर असेल.

नाइलाजाने आयोजन
माजी अध्यक्ष शशांक मनोहर, निरंजन शहा आणि शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणार्‍यांनी पडद्यामागून हालचाली करून बैठकीसाठी संबंधितांकडे आग्रह धरला होता. त्यामुळे नाइलाजाने कार्यकारिणीची बैठक आयोजित करावी लागली.