आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Clean Cheat To Shriniwasan , News In Marathi

बीसीसीआय सुंदर रमण यांच्या पाठीशी , एन. श्रीनिवासन यांना कार्यकारिणीची ‘क्लीन चिट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -‘आयपीएलस्पॉट फिक्सिंग’ संदर्भातील न्या. मुद्गल समितीच्या अहवालाच्या सविस्तर चर्चेअंती आज बीसीसीआयच्या कार्यकारिणीने, मंगळवारी चेन्नई येथील बैठकीमध्ये, अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’ दिली तर आयपीएल, सीओओ सुंदर रमण यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणारी ८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णयही आज कार्यकारी समिती सदस्यांनी घेतला.
न्या. मुद्गल समितीच्या अहवालाची प्रत मंगळवारी प्रत्येक कार्यकारिणी सदस्याला देण्यात आली होती. त्या अहवालाचे सविस्तर वाचन केल्यानंतर सर्व सदस्यांनी एकच सूर काढला की, एन. श्रीनिवासन यांच्या वर्तणुकीबाबत अहवालात कोणत्याही प्रकारे शिंतोडे उडवण्यात आले नाहीत. काही अतृप्त प्रवृत्तींनी बीसीसीआयचे कार्य अस्थिर, डळमळीत करावे या हेतूने चिखलफेक केली. प्रत्यक्षात अहवालात त्यांच्याबाबत कोणतीही गैरटिप्पणी नसल्याचे कार्यकारिणीचे मत पडले. सुंदर रमण यांनीही त्यांच्यासंदर्भात अहवालात करण्यात आलेल्या टिप्पणीवर आपली बाजू मांडली खुलासा केला. रमण यांची अहवालातील आक्षेपांबाबत उत्तरे ऐकल्यानंतर सर्व सदस्यांनी रमण यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीअायच्या वार्षिक सभेला १७ डिसेंबरचा मुहूर्त
कार्यकारीसमितीने सी. के. नायडू पुरस्कार समितीच्या दिलीप वेंगसरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. बीसीसीआयची ८५वी वार्षिक सर्वसाधारण सभा आता १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता चेन्नईच्या आयटीसी, पार्क शेरटन हॉटेलमध्ये होईल.