आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येणार, क्रीडा विधेयकात तरतूद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आतापर्यंत माहिती अधिकार कक्षेत येत नसल्याचा निर्वाळा देणा-या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) भारत किंवा भारतीय या शब्दांच्या वापरामुळे माहिती अधिकार कक्षेत सामील केले जाऊ शकते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने संकेतस्थळाद्वारे जारी केलेल्या प्रस्तावित क्रीडा विधेयकाच्या मसुद्यात याबाबत चर्चा करण्यात आली आहे.आणि त्यावर सामान्य नागरिक तसेच अन्य घटकांकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत.


प्रस्तावित विधेयकाच्या मुख्य नियमात आंतराष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारत किंवा इंडिया शब्दांचा वापर करण्यासाठी काही विशेष अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. या विधेयकाच्या मसुद्याची एक प्रत आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक संघटनेस (आयओसी) पाठविली जाईल.


माहिती अधिकार कक्षेत येणे अनिवार्य होईल
आंतरराष्‍ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणे, भारत किंवा भारतीय शब्दांचा उपयोग करण्यासाठी संबंधीत क्रीडा महासंघास विधेयक नियम चार आणि नऊनुसार माहिती अधिकार कायद्याचे पालन करणे अनिवार्य राहील. बीसीसीआयने माहिती अधिकार कक्षेत येत नसल्याचा निर्वाळा अनेकदा दिला आहे परंतु या विधेयकातील नियमाच्या अनुसार त्यांच्याद्वारे इंडिया शब्दाचा वापर केल्या जातो. या विधेयकामुळे आता बीसीसीआयला माहिती
अधिकार कक्षेत यावे लागेल किंवा भारतीय शब्दाचा वापर यानंतर थांबवावा लागेल.