आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Cricket Operation General Manager Ratnakar Shetty On Five Years Banned

आरोप भोवले; रत्नाकर शेट्टी यांच्यावर बंदी, एमसीएची कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीने माजी पदाधिकारी व बीसीसीआयचे क्रिकेट ऑपरेशन्स जनरल मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. अहमदाबाद येथील भारत-पाक क्रिकेट सामन्याची काही तिकिटे एमसीए पदाधिकार्‍यानी काळ्याबाजारात विकली, असा खळबळजनक आरोप रत्नाकर शेट्टी यांनी अलीकडेच एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला होता. त्या आरोपांची सत्यता सिद्ध करण्याची विनंती एमसीए कार्यकारिणीने रत्नाकर शेट्टी यांना केली होती. त्या वेळी शेट्टी यांनी आपल्या प्रत्युत्तरात आपण असे आरोपच केले नाहीत तेव्हा ते आरोप सिद्ध करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही, असे म्हटले होते.
त्यावर असोसिएशनने त्या बैठकीची ध्वनिफीत शेट्टी यांना पुन्हा ऐकविली होती. त्यामध्ये रत्नाकर शेट्टी यांनी पदाधिकार्‍यानी तिकिटांचा काळाबाजार केल्याची शंका व्यक्त केल्याचे निष्पन्न झाले होते. रत्नाकर शेट्टी यांना त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेले आरोप सिद्ध केले नाहीत, त्यामुळे पदाधिकार्‍याची नाहक बदनामी केल्याबद्दल शेट्टी यांना शिक्षा म्हणून 5 वर्षे असोसिएशनच्या कामकाजात सक्रिय सहभागापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बंदीमुळे शेट्टी यांना एमसीएच्या वास्तूतील प्रवेश रोखला जाणार नाही. 2 जूनपासून ही बंदी लागू करण्यात आली आहे. शेट्टी यांना त्यांच्यावरील बंदीचे पत्र आज सकाळी देण्यात आले.

न्यायालयात जाणार
या बंदीबाबत प्रतिक्रिया देताना रत्नाकर शेट्टी म्हणाले, ‘या बंदीविरुद्ध मी निश्चितच न्यायालयात जाणार आहे. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मी मुंबई क्रिकेटची गेली क्रित्येक वर्षे सेवा केली आहे. त्याचे हेच फळ मला देणार काय?’