नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दौरा अर्ध्यावर सोडल्याप्रकरणी नुकसान भरपाई म्हणून वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाला (डब्ल्यूसीबी) २५० कओटी रुपयांचा मोबदला मागितला आहे. ही रक्कम भरण्यासाठी आता बीसीसीआयने विंडीजच्या क्रिकेट मंडळावर दबाव आणला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी डब्ल्यूसीबीचे अध्यक्ष डेव कॅमरून यांना पत्र पाठवले. ‘मोबदल्याची रक्कम येत्या १५ िदवसांच्या आत न भरल्यास डब्ल्यूसीबीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशाराही पटेल यांनी पत्रातून विंडीज क्रिकेट मंडळाला दिला आहे.
मागील महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ पाच वनडे, तीन कसोटी आणि एक टी-२० सामना खेळण्यासाठी भारत दौर्यावर आला होता. मात्र, धर्मशाला येथील चौथ्या वनडेनंतर डब्ल्यूसीबी आणि प्लेअर्स असोसिएशन यांच्यात वेतनावरून वाद निर्माण झाला. याच वादातून अखेर भारताचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा प्रकारे दौरा अर्ध्यावर सोडल्याने बीसीसीआयचे सचिव पटेल यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली.
‘आम्हाला यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तसेच बीसीसीआयच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे,’असेही पटेल म्हणाले. वादावर तोडगा निघण्यापूर्वीच बीसीसीआयने दोन्ही देशांमधील सर्वच क्रिकेट मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या विंडीज क्रिकेट मंडळाचे लवकरच
दिवाळे निघण्याची शक्यता आहे,असेही चित्र आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा : रॉबर्ट्स
वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने (डब्ल्यूआयसीबी) तात्काळ
आपला प्रतिनिधी भारतात पाठवला पाहिजे. बीसीसीआयच्या अध्यक्षांशी चर्चा करून विंडीजच्या अधिकार्यांनी परिस्थितीवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न करावा. कारण नुकसान भरपाईच्या मोठ्या रकमेतून विंडीजमधील क्रिकेटचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते, अशी प्रतिक्रिया विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांनी दिली.