आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Directs To Make Flat Pitches For IPL\'s Success

‘पाटा’ खेळपट्टी करण्याचे आदेश!, आयपीएल यशस्वितेसाठी बीसीसीआयचा फंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे आर्थिक गणित यशस्वी होण्यासाठी विविध उपाययोजना करत असलेल्या बीसीसीआयने सामने आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व केंद्रांना खेळपट्ट्या गोलंदाजीसाठी नव्हे, तर फलंदाजीसाठी योग्य अशा करण्याचे आदेश दिले आहेत.
खेळपट्टी तयार करण्यासंबंधी निर्णय घेणाऱ्या समितीचे प्रमुख दलजितसिंग यांनी दूरध्वनीद्वारे सर्व केंद्रांना तसा संदेश पाठवला आहे.
काही केंद्रांवरील खेळपट्ट्या हिरव्याकंच दिसत होत्या. अशा केंद्रांवर सरासरी धावसंख्या १७० इतकी नोंदवली गेली. अशा केंद्रांना प्रामुख्याने खेळपट्टीवर हिरवेगार गवत न ठेवण्याचे आदेश देण्यात अाले आहेत. मोठा स्क्ो अर होण्यासाठी, चौकार, षटकारांचा पाऊस बरसण्यासाठी हे प्रयत्न आहेत. बीसीसीआयने सुरू केलेल्या ‘फॅन पार्क’मधील प्रेक्षकांनाही धावांचा पाऊस पडलेला पाहायचा आहे.
मुंबईच्या खेळपट्टीवर पाँटिंग खुश
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सचा रिकी पाँटिंग मात्र खुश आहे. त्याने आपल्याला अशीच चेंडू बॅटवर वेगात येणारी व अधिक उसळी असणारी खेळपट्टी अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. याच खेळपट्टीवर यजमान मुंबई इंडियन्सला सलामीची लढत मात्र जिंकता आली नव्हती.