आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयला आयपीएलमध्ये 385 कोटींचा नफा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बीसीसीआयला सहाव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाचव्या सत्रापेक्षा दुप्पट नफा मिळाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थ समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्यांना चालू वर्षातील विविध आर्थिक नफ्यांची माहिती दिली.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल-6 मधून बीसीसीआयला 385 कोटी 36 लाखांचा नफा झाला. यापूर्वी, 2012 मध्ये 174 कोटी 73 लाखांचा नफा झाला होता. आयपीएलच्या नफ्यात 210 कोटींची वाढ झाली. वाडेकरांना पाच लाख : माजी कर्णधार अजित वाडेकर यांना शस्त्रक्रियेसाठी पाच लाख 33 हजारांच्या बिलाला अर्थ समितीने मान्यता दिली.