आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लेचर यांचा कार्यकाळ वाढणे अनपेक्षित...!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्याच्या निर्णयामुळे फक्त भारतात नव्हेतर संपूर्ण क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागच्या वीस महिन्यांत भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौर्‍यावर 4-0 ने कसोटी मालिका गमावल्या होत्या. इंग्लंडने तर भारतीय भूमीवर येऊन आपल्याला पराभूत केले होते. याशिवाय आपल्या भूमीवर पाकिस्ताननेसुद्धा वनडेत मालिका विजय मिळवला होता. यामुळे फ्लेचर यांच्यावर भरवसा केला जाईल, किंवा त्यांच्या बाजूने अशी कोणती गोष्ट घडली, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत भारताने शानदार विजय मिळवला. याचे बक्षीस त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. आकड्यावर लक्ष घातले तर फ्लेचर कोच बनल्यानंतर भारताने सातपैकी तीन मालिका जिंकल्या आणि चौथ्या मालिका विजयापासून भारत एका पावलाने दूर आहे. भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांच्या आणि आपल्या भूमीवर मालिका जिंकली. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धही आपण विजय मिळवला होता. आता भारताचा चौथा मालिका विजय जवळपास निश्चित आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

आकडेवारी फ्लेचर यांच्या बाजूने असली तरीही भारतीय संघाने दुबळ्या संघाविरुद्ध विजय मिळवला. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आपल्या टीमने लोटांगण घातले. भारतातसुद्धा इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत आणि पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेत आपल्या टीमचे प्रदर्शन घसरले होते तेव्हा फ्लेचर यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अशा परिस्थितीत फ्लेचर यांनी बीसीसीआयच्या कार्यसमितीचे मन कसे जिंकले, हे विचार करण्यासारखे आहे. कोच आणि कर्णधार लवकर बदलल्यामुळे दीर्घकालीन योजना कार्यान्वित होत नाहीत, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. उदाहरण म्हणून सध्या ऑस्ट्रेलिया संघाचे कोच असलेल्या मिकी ऑर्थर यांचे नाव घेतले जाते. त्यांनी प्रदीर्घ काळ कोच राहून दक्षिण आफ्रिकेला नंबर वन बनवण्यात यश मिळवले. तसे बघितले तर आपले दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविडसुद्धा फ्लेचर यांनी कोच म्हणून कायम ठेवण्यास फ्लेचर यांना पाठिंबा दिला आहे. असे काही वरिष्ठ क्रिकेटपटू आहेत, ज्यांना टीम इंडियाचे कोच म्हणून एखाद्या भारतीयाला पाहण्याची इच्छा आहे असे म्हणणे सोपे आहे. मात्र, या पदासाठी सुयोग्य व्यक्ती सध्या भारतात तरी सापडणे कठीण आहे. आपण आपले वरिष्ठ खेळाडू कपिलदेव, सौरव गांगुली किंवा सुनील गावसकर यांचे नाव घेतले तर हे खेळाडू समालोचक बनले आहेत. यांच्याकडे प्रशिक्षणासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान नाही. हे फक्त सल्ला देऊ शकतात. मात्र, एका फुलटाइम कोचच्या भूमिकेत येणे ते बहुदा पसंत करणार नाहीत. विदेशी कोच असल्याचा फायदासुद्धा आहे. त्यांच्या मनात प्रादेशिक भावना निर्माण होत नाहीत. याविरुद्ध भारतीय कोच असल्यास तो अतिरिक्त रुची ठेवून आपल्याच भागातील खेळाडूंना प्रमोट करण्याची शक्यता असते. फ्लेचर यांना लाइफलाइन मिळाली आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेटचा फायदाच होईल, अशी आशा करुया.