आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - स्पॉट फिक्सिंगमधील खेळाडूंविरुद्ध आरोपांची चौकशी रवी सवानी यांनी पूर्ण केली असून आपला अंतरिम अहवाल बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीला सादर केला आहे. शिस्तपालन समितीने त्या अहवालानुसार संबंधित खेळाडूंवर आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय सोमवारी कार्यकारिणीत घेतला.
कार्यकारिणीने क्रिकेट या खेळाची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करण्याचा निर्णय आज घेतला. सर्व स्तरातून त्यासाठी सूचना मागवण्याचा निर्णयही झाला. आयपीएल अधिक पारदर्शक पद्धतीने व घोटाळ्यांशिवाय आयोजित करण्यासाठी फ्रॅँचायझींकडून सूचना मागवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. आयपीएल स्पॉट
फिक्सिंगची चौकशी करणा-या चौकशी आयोगाची आज पुन्हा नियुक्ती करण्यात आली. या चौकशी आयोगामध्ये आता न्यायमूर्ती आर. बालसुब्रह्मण्यम आणि न्यायमूर्ती जयराम टि. चौटा हे असतील.
आयपीएल समितीकडून आलेल्या तक्रारींवरच आयोग चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे. गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, चेन्नई सुपरकिंग्ज् फ्रॅँचायझी व राजस्थान रॉयल्स या फ्रॅँचायझींची चौकशी करण्यास आयोगाला सांगण्यात आले आहे. दरम्यान, आज बीसीसीआयनेच राज कुंद्रा यांना चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित केले असून क्रिकेटविषयक कारभारापासून दूर राहण्यास सुचविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.