आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Get Support From Asian Countries Over Siva\'s Appointment

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सहभागी होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी स्पष्ट केले. माजी लेगस्पिनर एल.शिवरामकृष्णन यांच्या नियुक्तीवरून वादंग निर्माण झाले होते. यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा होती. मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या चर्चेवर पडदा टाकला.

‘अशा प्रकारच्या अफवांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. मी अशा अफवांना फेटाळून लावतो. निश्चितपणे टीम इंडियाचा या स्पर्धेत सहभाग राहील,’अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.

बीसीसीआयने शिवरामकृष्णन यांच्या नियुक्तीसाठी दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप फिकाने केला. मात्र, आयसीसीने या आरोपातून बीसीसीआयला क्लीन चिट दिली. फिकाचे आरोप तथ्यहिन असल्याचे सांगून श्रीलंका व पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला पाठिंबा दिला आहे.