आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआरएफ पेस फाउंडेशनशी बीसीसीआयचा करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जहीर खानच्या अनुपस्थितीत वेगवान व मध्यमगती गोलंदाजीची समस्या टीम इंडियाला सध्या भेडसावत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने वेगवान गोलंदाज प्रशिक्षीत करण्याचे शास्त्रशुद्ध प्रयत्न करणाऱ्या एमआरएफ फाउंडेशनशी आगामी पाच वर्षांसाठी आज करार केला.
भारत, श्रीलंका, बांगलादेश व परिसरातील देशांच्या वेगवान गोलंदाजांना प्रगत प्रशिक्षण देण्याचे काम एमआरएफ पेस फाउंडेशनने १९८७ पासून चेन्नई येथे सुरू केले होते. गेली २७ वर्षे वेगवान गोलंदाजांना परिपूर्ण करण्याचे त्यांचे अविरत कार्य अजूनही सुरू आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून गोलंदाजांना परिपूर्ण प्रशिक्षण देता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर बीसीसीआयने एमआरएफ फाउंडेशनशीच सामंजस्य करार केला आहे.

या करारानुसार एलिट (प्रगत) आणि प्रॉबेबल्स (संभाव्य) असे प्रशकि्षण देण्यात येणाऱ्या गोलंदाजांचे दोन विभाग करण्यात येतील.

एलिट विभागात प्रत्येक शिबिरासाठी १० गोलंदाजांची नविड करण्यात येईल. हे शिबिर दोन आठवड्यांचे असेल. त्याशिवाय या शिबिरात नविड झालेल्या गोलंदाजांना एमआरएफ पेस फाउंडेशनचे संचालक, माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांच्या भारतातील तीन वेगवेगळ्या कालावधीतील भेटीदरम्यान मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. मॅकग्रा जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै व ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत भारतात येणार आहेत.

मॅकग्राचे मार्गदर्शन
एमआरएफ फाउंडेशनच्या २७ वर्षांतील प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षीत झालेल्या गोलंदाजांपैकी एकूण १७ गोलंदाजांनी आपापल्या देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केले. या सर्वांनी मिळून आतापर्यंत दोन हजारांवर विकेट घेतल्या आहेत. गेली दोन वर्षे एमआरएफ फाउंडेशनमधील प्रशिक्षणार्थींना ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्रा मार्गदर्शन करत आहेत.

एमआरएफचे यशस्वी खेळाडू
वरुण अॅरोन, राहुल शुक्ला, ईश्वर पांडे, अशोक डिंडा, वीर प्रताप सिंग, दीपक चहार, नथू सिंग, अंकति राजपूत, अतुरति सिंग, शार्दूल ठाकूर, सी. व्ही. मिलिंद.