आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI News In Marathi, Divya Marathi, Indian Cricket

पत्नी, प्रेयसीची सोबत; क्रिकेटपटूंवर बंदी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निकिता विजय, आयशा धवन, साक्षी धोनी, पूजा पुजारा यांचे इंग्लंड दौऱ्याच्या वेळचे एकत्र छायाचित्र. )
नवी दिल्ली - क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआय लवकरच नवीन दिशानिर्देश जारी करण्याचा विचार करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आता क्रिकेटपटूंना कोणत्याही परदेश दौऱ्यावर प्रेयसीला सोबत नेता येणार नाही. याशिवाय दौऱ्यावर क्रिकेटपटूंच्या पत्नीच्या थांबण्याचा अवधीही मर्यादित करण्याचा वा त्यावर बंदी आणण्याचा विचार केला जात आहे.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या गचाळ कामगिरीमागे क्रिकेटपटूंकडून सरावापेक्षा अधिक वेळ पत्नी किंवा प्रेयसीला दिल्याचेही कारण असल्याचे बीसीसीआयने मान्य केले आहे. विराट कोहलीच्या ढिसाळ फलंदाजीने बीसीसीआयला या मुद्द्यावर वि चार करण्यास बाध्य केले आहे. विराटने प्रेयसी अनुष्का शर्माला इंग्लंड दौऱ्यावर सोबत नेले होते.