आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Nomited To Vengaskar For Lifetime Achievement Award

वेंगसरकरांचा गौरव; भुवनला पुरस्कार ! बीसीसीआयचे वार्षिक पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बोर्डऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया अर्थात बीसीसीआयने २०१३-१४ या वर्षातील क्रिकेट पुरस्कार घोषित केले असून, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंचवीस लाख रुपये चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर उदयोन्मुख गोलंदाज भुवनेश्वरकुमार यास भारतीय संघातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार असून पाच लाख रुपये चषक असा पुरस्कार आहे. महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू केदार जाधवला माधवराव शिंदे पुरस्कार मिळणार आहे.
सुप्रसिद्ध पत्रकार शेखर गुप्ता, बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव बीसीसीआयचे मानद चिटणीस संजय पटेल यांच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. १९७५-७६च्या मुंबई विरुद्ध शेष भारत या सामन्यामध्ये दिलीप वेंगसरकर या मुंबईच्या खेळाडूने भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावरील आपले आगमन दणक्यात साजरे केले. या खेळाच्या जोरावर दिलीप वेंगसरकर याची वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. ऑकलंड येथील सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात वेंगसरकर यांचा भारतीय संघात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केले. क्रिकेट या खेळाची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर तीन शतके झळकवणारा एकमेव बिगर इंग्लिश खेळाडू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीयांनी पहिलाच विजय मिळवला. त्या कसोटीमध्ये वेंगसरकर यांनी शतक ठोकले होते. १९८६-८७ या वर्षात वेंगसरकर यांना जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरवण्यात आले होते. १९८३च्या विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये असणारे वेंगसरकर हे १९८५मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. दहा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारे वेंगसरकर हे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्षदेखील होते.
कसोटीसामन्यांत २८ बळी भुवनेश्वरने घेतले आहेत.
वनडेत भुवनेश्वरने भारताकडून खेळताना ४५ बळी घेतले.
अनिल चौधरी - सर्वोत्कृष्टपंच
दिलीप वेंगसरकर - सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
भुवनेश्वरकुमार- पॉलीउम्रीगर पुरस्कार
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणाला मिळाले पुरस्‍कार