आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा विशेष: श्रीनिवासन जिंकले की हरले ? अद्याप अनिश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीसीआयमध्ये सध्या काय घडत आहे, याची माहिती जाणण्यासाठी इच्छुक असणार्‍याना शुक्रवारच्या घटनेनंतर मातीच्या खेळपट्टीवर खेळल्यासारखे वाटत असेल. बीसीसीआय कार्यसमितीची बैठक स्थगित झाली आहे. काय समजायचे, श्रीनिवासन जिंकले की हरले ?..माझ्या मते, याबाबत निर्णय घेणे अद्याप कठीण आहे. होय, सप्टेंबरमध्ये होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेतच श्रीनिवासन अजूनही शक्तिशाली आहेत की नाही, हे निश्चितपणे कळू शकेल. त्या वेळी शक्तिसंघर्ष शिगेला पोहोचलेला असेल. मंडळाच्या कार्यसमितीची बैठक तर होऊ शकली नाही. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) झालेली सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मंडळाकडून गठित करण्यात आलेली दोन सदस्यीय समिती मुंबई उच्च न्यायालयाने अवैध आणि बेकायदेशीर ठरवली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच श्रीनिवासन यांचे पुनरागमन निश्चित होईल.

मागच्या दोन दशकांतील बीसीसीआयच्या कार्यपद्धतीचे आकलन केले तर एक चित्र स्पष्ट दिसते की, बोर्ड एका अखंड चक्राप्रमाणे आहे. हे चक्र संपत नाही. तुम्ही एखाद्या प्रकरणाला सोडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरे चक्र सुरू होते. कार्यसमितीच्या बैठकीबाबत बोलायचे झाल्यास, ही बैठक स्थगित झाल्याने श्रीनिवासन यांना जोरदार धक्का बसला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून गठित करण्यात आलेल्या दोन सदस्यीय न्यायाधीशांच्या पॅनलच्या निर्णयाद्वारे ते पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी आतुर होते. काही जण आपला विरोध करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नवी दिल्लीत जे घडले, ते बघून असे वाटते की सप्टेंबरमध्ये विरोधी गट जाहीरपणे समोर येईल आणि श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढतील. याशिवाय संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी सचिव आणि कोशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन यापूर्वीच आपला विरोधी जाहीर केला आहे. मंडळाचे उपाध्यक्ष निरंजन शहा यांनीसुद्धा श्रीनिवासन यांना जोरदार विरोध केला. श्रीनिवासनविरुद्ध वाढता विरोध बघून शरद पवार यांचे मंडळात पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत. पवारांचे समर्थकच श्रीनिवासन यांचा विरोध करीत आहेत. दरम्यान, पुनरागमनाची इच्छा पवार यांनी व्यक्त केली आहे. एक काळ असाही होता, ज्या वेळी पवार अध्यक्ष होते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच चेन्नई सुपरकिंग्जला आयपीएलमध्ये सामील करण्यात आले होते. मात्र, राजकारणसुद्धा काही कमी नाही. आता दोघेही एकमेकांचे विरोधी असून दोघांत सत्तासंघर्ष सुरू आहे. पवार सध्या मंडळात नसले तरीही त्यांचे समर्थक श्रीनिवासन यांना दबावात ठेवून आहेत. बीसीसीआयमध्ये राजकारणाचा खेळ सुरू झाला आहे आणि असणारसुद्धा का नाही. अखेर पाच अब्ज डॉलरचा व्यवसाय आहे. मंडळात पसरलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे समोर येत आहेत. मंडळाचे पदाधिकारी आता पूर्वीपेक्षा दुबळे आणि असुरक्षित असल्याचे दिसत आहे.

खेळाडूंची नावे स्पॉट फिक्सिंगमध्ये चमकत आहेत. मंडळ आता सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी सर्वोच्च असेल. यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली पाहिजे. खरे तर आता श्रीनिवासन पूर्वीइतके शक्तिशाली असतील की, नाही; याला फार महत्त्व राहिलेले नाही.