सिडनी - फिक्सिंगच्या आरोपावरुन बीसीसीआयच्या अध्यपदावरुन सुप्रीम कोर्टाने निलंबित केलेले श्रीनिवासन ICC च्या अध्यक्षपदी निवडले जावू शकतात. याविषयीचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये मेलबर्नमध्ये होत असलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्ये होणार आहे.
श्रीनिवासन यांना क्रिकेट जगतातील सर्वांधीक शक्तीशाली अध्यक्ष मानले जाते. 69 वर्षीय श्रीनिवासन आयपीएलच्या फिक्सिंग प्रकरणातील 13 आरोपींपैकी एक आहेत. आयपीएल घोटाळ्यातील मुख्या आरोपी मय्यप्पन श्रीनिवासन यांचा जावाई आहे. सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करुन त्यांच्या जागी सुनील गावस्कर यांची नियुक्ती केली आहे.
''जून महिन्याच्या अखेरीस भारत आयसीसीचे नेतृत्व करणार असून श्रीनिवासन आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त होवू शकतात. आम्ही दोघे पुढील आठवड्यात बैठकीला जाणार असून आमच्याद्वारे बनविले गेलेले फायनान्शियल मॉडेल सर्वच सदस्यांच्या पसंतीत उतरले आहे.'' असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सिडनी मॉर्निग हेरॉल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.