आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयने आरटीआयच्‍या अंतर्गत यावे किंवा भारत शब्‍द सोडावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय क्रिकेट मंडळसहित सर्व राष्‍ट्रीय क्रीडा महासंघाना आरटीआयच्‍या अंतर्गत येणे बंधनकारक असेल. जर असे केले नाही तर सरकारला टीमला लावण्‍यात आलेला भारत शब्‍दाचा वापर करण्‍यास प्रतिबंध करण्‍याचा अधिकार असेल. राष्‍ट्रीय क्रीडा विकास विधेयक 2013चा मसुदा तयार करणा-या कार्यसमूहाचे अध्‍यक्ष सेवानिवृत्त जज मुकूल मुदगल यांनी सर्व क्रीडा संघटनांना या विधेयकाअंतर्गत माहिती अधिकार अधिनियम (आरटीआय) अंतर्गत यावे लागेल. ज्‍यामध्‍ये बीसीसीआयचाही समावेश आहे, असे म्‍हटले.

जर हे विधेयक अधिनियमाचे रूप घेतले तर सर्व क्रीडा महासंघाना आरटीआयच्‍या अंतर्गत यावे लागेल. यामध्‍ये काही अपवादही आहेत. ज्‍यामध्‍ये खेळाडूंचे पत्ते, आरोग्‍यासंबंधी माहिती, निवडीची प्रकरणे, व्‍यावसायिक रूपाने त्‍यांचा गोपनीय माहितीत सामील होईल, असे मुदगल यांनी म्‍हटले. ते म्‍हणाले, यामध्‍ये कलम चार अंतर्गत सरकारला हा अधिकार मिळेल ज्‍याचे अपिल ट्रिब्‍यूनलमध्‍ये जाऊन भारत शब्‍दाचा वापर करण्‍यापासून रोखता येईल.