आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांची हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना त्यांच्या बडोदा क्रिकेट संघटनेने कार्यकारिणी सदस्य सचिवपदावरून हटवले होते. संघटनेच्या त्या निर्णयावर बडोदा न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले.
मुख्य न्यायाधीश संजयभाई ठक्कर यांनी संघटनेच्या आणि संजय पटेल यांच्या अर्जावर निर्णय देताना पटेल यांची याचिका फेटाळत दोन्ही दाव्यांचा खर्चदेखील पटेल यांनी द्यावा, असा आदेशही दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार संजय पटेल हे या क्षणापासून बडोदा संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्यही नसतील. आता त्यांचे बीसीसीआयचे सचिवपदही धोक्यात आले आहे.