आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयची आयसीसीला मुंबईतील महिला विश्वचषक बाबत फेरविचार करण्याची विनंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - पाकिस्तानी क्रीडापटू आणि कलावंत यांना शिवसेना आणि अन्य काही राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेऊन बीसीसीआयने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महिला विश्वचषक क्रिकेटच्या आयोजनाच्या ठिकाणाबाबत फेरविचार करण्याची विनंती आयसीसीला केली आहे.

येत्या 31 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या संदर्भात विचारविनियम करण्यासाठी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आयसीसीला या संदर्भात सद्य परिस्थितीची जाणीव बीसीसीआयने करून दिली आहे. आज एन. श्रीनिवासन, अरुण जेटली, राजीव शुक्ला या महत्त्वाच्या व्यक्तींनी टेलिकॉन्फरन्सद्वारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पाकविरुद्ध शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे म्हटले असे कळते. क्रीडापटू व कलावंत यांना भारतात खेळू देणार नाही, अदाकारी पेश करू देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे, हे उद्धव ठाकरे यांनी पुुन्हा एकदा या चर्चेदरम्यान स्पष्ट केले.