आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी युनिटसाठी आयसीसीला पोलिसी सहकार्याची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - क्रिकेट या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेला आवर घालण्यासाठी निकालनिश्चितीच्या प्रकरणांना वारेमाप प्रसिद्धी दिली जात असल्याचे धक्कादायक सत्य नजरेसमोर आले आहे. फुटबॉल, टेनिस, गोल्फ, मोटार स्पोर्ट्स यांच्यासारख्या विश्वविख्यात खेळातही निकालनिश्चिती होते. मात्र, क्रिकेटप्रमाणे ते कटू सत्य वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला जात नाही याबाबतही सध्या आवाज उठवला जात आहे.
क्रिकेटमधील सट्टेबाजीला खूपच प्रसिद्धी दिली जाते. खेळाडूंची साक्ष गुप्त राखण्याऐवजी प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवली जाते. आयसीसीचे सीईओ जेव्हा रिचर्डसन यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. आणखी एक कटू सत्यही त्यांनी सांगितले आहे. गेल्या 14 वर्षांत आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटला एकाही खेळाडूला शिक्षा करता आली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे आयसीसीच्या या युनिटला कायद्याची जरब नाही. कोणत्याही देशातील पोलिस यंत्रणाच गुन्हेगारी व सट्टेबाजांना पकडू शकतात आणि शिक्षा करू शकतात. अनेक प्रकरणे फुटल्यानंतरही आयसीसीची युनिट चौकशी करण्यापलीकडे काहीही करू शकली नाही.