आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI's Disciplinary Committee Fixed Charge Sheet Against Lalit Modi

बीसीसीआयच्या अनुशासन समितीच्या चौकशीत ललित मोदी दोषी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी आयपीएल प्रमुख ललित मोदींना आर्थिक अफरातफरींसह वेगवेगळ्या आठ प्रकरणांत दोषी ठरवले आहे. बीसीसीआयच्या अनुशासन समितीने 134 पानी अहवाल तयार केला असून आर्थिक अफरातफर, फॅँचायझी संघ विक्रीत गडबड, टीव्ही अधिकारांची स्वैर विक्री केल्याचा ठपका मोदींवर आहे.


बीसीसीआयचे अरुण जेटली, चिरायू अमीन आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समितीने अहवाल तयार केला. त्यावर 25 सप्टेंबरला बैठकीत निर्णय होणार आहे. ललित मोदींवर आजीवन बंदीची शक्यता वर्तवली जात आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. जेटली आपले विरोधक राहिलेत. बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचे ते समर्थक आहेत. श्रीनिवासन यांच्याविरुद्ध आवाज उठवल्यामुळेच आपल्यावर ठपका ठेवण्यात आला असून ही चौकशी पूर्ण एकतर्फी असल्याचा आरोप त्यांनी केला.