Home | Sports | Latest News | be-aware-from-australia-team

ऑस्ट्रेलिया श्रीलंकेत आक्रमक कामगिरी करण्याची शक्यता

वृत्तसंस्था | Update - Jul 17, 2011, 02:15 PM IST

श्रीलंकेचे नवनियुक्त प्रशिक्षक रुमेश रत्नायके यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या आगामी दौऱ्याबाबत संघाला सतर्क केले आहे.

  • be-aware-from-australia-team

    कोलंबो - श्रीलंकेचे नवनियुक्त प्रशिक्षक रुमेश रत्नायके यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या आगामी दौऱ्याबाबत संघाला सतर्क केले आहे. गेल्या काही सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज श्रीलंकेविरुद्ध आक्रमक फलंदाजी करून सहज श्रीलंकेचा पराभव करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेत दोन ट्वेंटी-२०, पाच एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला ट्वेंटी-२० सामान ६ ऑगस्टला होणार आहे. ईएसपीएनशी बोलताना रत्नायके म्हणाले, ऍशेस आणि विश्वकरंडकात झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत विजयासाठी आतुर दिसेल. त्यामुळे आम्हाला चांगला खेळ करणे आवश्यक आहे. श्रीलंकेचा संघ सध्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करीत असून, आम्ही सलग दोनवेळा विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोचलो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्यावर आमचा जोर आहे.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending