आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beating India Is No Longer An Upset: Mashrafe Mortaza, Asia Cup News In Marathi

बांगलादेशी खेळाडूचे खुले आव्‍हान; म्‍हटले, भारताला हरविणे मोठी गोष्‍ट नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि यजमान बांगलादेश यांच्‍यादरम्‍यान लढत होत आहे. विदेशी भूमीवर सुमार कामगिरीमुळे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या टीम इंडियासमोर या स्पर्धेत चांगल्या कामगिरीचे आव्हान असेल.

धोनीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करीत असलेला प्रभारी कर्णधार विराट कोहलीने चांगल्या कामगिरीसाठी आशा व्यक्त केली आहे.

30 वर्षीय बांगलादेशी गोलंदाज मुतरुजाने म्‍हटले आहे, की ''भारत हा एक दिग्‍गज संघ्‍ा आहे. परंतु त्‍याचे आमच्‍यावर काही दडपण नसून आम्‍ही गेल्‍या आशिया चषकात भारताला मात दिली होती. आणि आताही देऊ शकतो''.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका अ‍ाणि न्‍यूझीलंडमध्‍ये अत्‍यंत खराब प्रदर्शन केले आहे. जर आम्‍ही चांगले खेळलो तर घरच्‍या मैदानाव विजय मिळविणे आम्‍हास अवघड जाणार नाही.