आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद सोडले - नोब्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - प्रकृती चांगली नसल्याने भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षकपद सोडल्याचे मायकेल नोब्स यांनी सांगितले. हॉकी संघाच्या मागील वर्षभरातील सुमार कामगिरीमुळे नोब्स यांची पदावरून हकालपट्टी झाल्याचे वृत्त होते.


‘उच्च रक्तदाबामुळे अधिक अडचणीत येत आहेत, अशी माहिती हॉकी इंडियाचे रोलेंट ऑल्टमेन्स यांनी दिली होती. प्रकृती चांगली नसल्यामुळे प्रशिक्षण देण्याकडे पूर्ण लक्ष्य केंद्रित केले जाऊ शकत नव्हते. यामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला,’ असेही नोब्स म्हणाले. वैद्यकीय तपासणीत नोब्स यांचा रक्तदाब हा 180/ 120 असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बैठकीत संघाच्या कामगिरीवर सखोल चर्चा करण्यात आली होती. यानंतर नोब्स यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला.