आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Ministry Ignorance Record Missed By Sportman

मंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे विक्रमाचे स्वप्न अधुरे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देवळाली प्रवरा येथील अप्पासाहेब ढूस यांनी हवेतील सहा साहसी क्रीडाप्रकारांत प्रावीण्य मिळवले आहे. भारत ते श्रीलंका हे अंतर याच प्रकारे पार करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. मात्र, 2010 मध्ये परवानगीसाठी सादर केलेल्या प्रस्तावाला अद्याप केंद्रीय मंत्रालयाने मान्यता दिली नाही. परिणामी श्रीलंकेत झेप घेण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे, अशी खंत शिवछत्रपती पुरस्कार विजेते अप्पासाहेब ढूस यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
भारत ते श्रीलंका हे अंतर हवेतून पार करण्याचे ध्येय बाळगून त्यांनी विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण घेतले. 26 डिसेंबर 1999 रोजी त्यांनी पाचगणी येथे अडीच हजार फूट उंचीवरून झेप घेतली. त्यानंतर 2008 मध्ये दुबई येथे पॅराजम्पिंग क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्या वेळी 12 हजार फुटांवरून झेप घेणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले. त्यांच्या या साहसाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2009 मध्ये नोंद झाली. ढूस यांनी 2013 मध्ये पॉवर पॅराग्लायडिंगचे थायलंड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण घेतले. ते या क्रीडा प्रकारांत 14 वर्षांपासून मी सक्रिय आहे. भारत ते श्रीलंका हे अंतर हवेतून पार करण्याचे स्वप्न बाळगले आहे. या ध्येयाकडे वाटचाल करत असताना विक्रम झाले, पुरस्कारही मिळाले; पण राज्य क्रीडा विकास निधीतून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. श्रीलंकेत झेप घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या मंत्रालयाने हा प्रस्ताव केंद्रीय गृह खात्याकडे चौकशीसाठी पाठवला. 2010 पासून तो मंत्रालय पातळीवर प्रलंबित आहे. वेळोवेळी दिल्लीला केंद्रीय गृह मंत्रालय व उड्डयन मंत्रालयात खेट्या मारल्या, पण दखल कोणीही घेतली नाही. त्यामुळे श्रीलंकेत झेप घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दोन तासांत श्रीलंकेत
भारताच्या शेवटच्या टोकावरील रामेश्वर येथून श्रीलंकेपर्यंतचे अंतर सुमारे 35 ते 40 किलोमीटर आहे. यापूर्वी केरळला पॉवर हँगग्लायडिंगचे प्रशिक्षण मी घेतले होते. त्या वेळी समुद्रावर काही तास उड्डाण केले होते. त्यामुळे भारत ते श्रीलंका हे अंतर अवघ्या दीड ते दोन तासांत पार करता येईल, असे या वेळी ढूस यांनी सांगितले.