आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Rotation Sri Santh Will Take Rest Says Dravid

IPL: रोटेशनमुळे श्रीसंतला विश्रांती : राहुल द्रविड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- एका ठरलेल्या रणनीतीमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध लढतीत वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला अंतिम अकरा खेळाडूंत सामील करण्यात आले नाही. या वृत्ताला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने फेटाळले आहे. रोटेशनच्या आधारावर श्रीसंतला विश्रांती देण्यात आली, असे त्याने म्हटले. गेल्या काही वर्षांपूवी श्रीसंत आणि हरभजनसिंग यांच्यात घडलेले ‘थप्पड’ प्रकरण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहे. नव्याने हा वाद उद्भवल्याचे खापर श्रीसंतवर फोडण्यात आले. मागच्या आठवड्यात श्रीसंतने या वादाला हरभजनच जबाबदार असल्याचे ट्विट केले होते. पाठीत सुरा खुपसणारा व्यक्ती म्हणजे भज्जी, असे त्याने म्हटले होते. अशा परिस्थितीत मुंबईविरुद्ध रॉयल्सने श्रीसंतला याच कारणामुळे अंतिम अकरा खेळाडूंत खेळवले नसल्याची चर्चा होती. मात्र, द्रविडने या वृत्ताला नाकारले.