आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसूलच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियावर नियंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - जम्मू-काश्मीरचा ऑफस्पिनर परवेज रसूलच्या घातक गोलंदाजीने (45 धावांत 7 विकेट) पाहुण्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना वेसण घातली. दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारूंचा पहिला डाव अवघ्या 241 धावांत आटोपला.

रसूलने एकट्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला घाम फोडले. एक वेळ ऑस्ट्रेलियाची टीम 3 बाद 167 अशा चांगल्या स्थितीत होती. मात्र, रसूलच्या घातक गोलंदाजीमुळे कांगारूंचा डाव पहिल्या दिवसाचा खेळ संपायला काही षटके शिल्लक असताना 241 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाला पूर्ण डाव 88.3 षटकांत आटोपला.

23 वर्षीय रसूलने आपल्या प्रथम श्रेणीच्या कारकीर्दीत दुस-यांदा एका डावात सात विकेट घेण्याचा पराक्रम केला. लेगस्पिनर सरबजीत लड्डाने 26 षटकांत 90 धावांत 2 गडी बाद केले. स्टुअर्ट बिन्नीने दहा षटकांत 29 धावांत एक विकेट घेतली.ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर एड. कोवानने सर्वाधिक 58 धावा काढल्या. कोवान आणि उस्मान ख्वाजा यांनी 77 धावांची सलामी दिली. ख्वाजा 73 चेंडूंत 32 धावा काढल्या. तिस-या क्रमांकावर आलेल्या मॅथ्यू वेडने 35 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 76 चेंडूंत 2 षटकार आणि 1 चौकार मारताना 35 धावा काढल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्मिथने 107 चेंडूंत 3 चौकारांसह 41 धावा जमवल्या.

तळाचा फलंदाज पीटर सिडलने 22 धावा काढून संघाला दोनशेच्या पुढे पोहोचवले. अध्यक्षीय संघाकडून परवेज रसूलने 28.3 षटकांत 45 धावांत 7 गडी बाद केले. त्याने तब्बल 9 षटके निर्धाव टाकली. वेगवान गोलंदाज शमी अहेमदने 14 षटकांत 50 धावा दिल्या. त्याने 3 षटके निर्धाव टाकली. मात्र, त्याला एकही गडी बाद करता आला नाही. परविंदर अवाना यालासुद्धा एकही विकेट मिळाली नाही.

पाच कोटींचा मॅक्सवेल शून्यावर बाद झाला..!
आगामी इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या सहाव्या सत्रासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला पाच कोटींत मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. या सत्रातील तो सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. पाच कोटींचा करार करणा-या मॅक्सवेलला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौ-यासाठी संघात संधी मिळाली. या करारानंतर भारतात पहिल्यांदा आलेल्या मॅक्सवेलला सराव लढतीत भोपळा सुद्धा फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीने त्याला शून्यावर पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले. मॅक्सवेलला अवघी 8 चेंडू खेळता आली.

धावफलक
ऑस्ट्रेलिया इलेव्हन धावा चेंडू 4 6
कोवान झे. पार्थिव गो. रसूल 58 109 8 1
ख्वाजा झे. केदार गो. लड्डा 32 73 5 0
वेड झे. बदली गो. रसूल 35 76 1 2
स्मिथ झे. मनदीप गो. रसूल 41 107 3 0
मॅक्सवेल झे.पार्थिव गो. बिन्नी 0 0 0 0
हेन्रीक्युस झे. उथप्पा गो. लड्डा 16 33 2 0
सिडल झे. मन्दीप गो. रसूल 22 57 4 0
पँटिंसन झे. लड्डा गो. रसूल 9 32 1 0
लॉयन नाबाद 12 18 2 0
बर्ड त्रि. गो. रसूल 1 11 0 0

अगर यष्टीचीत गो. रसूल 0 7 0 0