आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ben Stokes And Stuart Broad Struggle To Sleep Because Of Langham Hotel's GHOSTS

भुताने उडवली इंग्लंडच्या क्रिकेटपटुंची झोप; पत्नी, गर्लफ्रेंड्सचा हॉटेलात राहण्यास नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागला तरी यजमान पराभवाला घाबरले असल्याचे सिद्ध करण्यासाठी एक कारण मिळाले आहे. लंडनमध्ये होणा-या सामन्यांच्या काळात इंग्लंडच्या खेळाडुंची राहण्याची व्यवस्था जगप्रसिद्ध लँघम हॉटेलमध्ये केली जाते. पण खेळाडुंनी याठिकाणी भूत असल्याची तक्रार केली आहे. डेलीमेलच्या एका बातमीनुसार अनेक खेळाडुंनी त्यांच्या खोल्या बदलण्याची विनंती केली आहे. तर काहींच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सनी तर हॉटेलमध्ये रहायलाच नकार दिला आहे. खेळाडुंनी झोप पूर्ण होत नसल्याची तक्रार केली आहे.
ब्रॉड आणि स्‍टोक्‍सला त्रास
याठिकाणी रात्री विचित्र घटना घडत असल्याचे खेळाडुंचे म्हणणे आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेबरोबर झालेल्या कसोटीसामन्या दरम्यान खोली बदलावी लागली असल्याचे त्याने म्हटले आहे. खोलीत एवढी गरमी होती की झोपच लागत नव्हती. त्यात अचानक बाथरूममधील नळ सुरू झाले. लाईट सुरू करताच नळ परत बंद झाले. हा अत्यंत वाईट अनुभव होता आणि त्यामुळे खूपच घाबरलो होतो, असे ब्रॉड म्हणाला. माझी गर्लफ्रेंड बीलेही या प्रकाराने घाबरली होती असेही तो म्हणाला. बेन स्‍टोक्‍सनेही झोप येत नसल्याची तक्रार केली आहे. तो हॉटेलमध्ये तिस-या मजल्यावरील खोली आहे. येथे काहीतरी खूपच विचित्र असल्याचे तो म्हणाला.
प्रायरचीही झोप उडाली
ब्रॉड म्हणाला माझ्या बरोबर जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा मला मॅट प्रायरही जागा असल्याचे दिसले. तोही ऑनलाईन होता. मी जेव्हा त्यच्या खोलीमध्ये गेलो तेव्हा त्यालाही असाच काहीसा अनुभव आल्याचे त्याने सांगितले. त्यारात्री आम्ही दोघेही झोपू शकलो नाही, असे त्याने सांगितले.

लँघम हॉटेलचा इतिहास
हे लंडनमधील सर्वोत्कृष्ट हॉटेल मानले जाते. 1985 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सने याचे उद्घाटन केले होते. मात्र या हॉटेलच्या कॉरिडोर आणि बेडरूममधून 7 भुतं फिरत असतात अशा चर्चा आहेत. यामध्ये हनिमूनदरम्यान पत्नीने खून केलेल्या एका जर्मन डॉक्टरच्या भुताचा यात समावेश असल्याचे म्हटले जाते. तसेच आत्महत्या केलेल्या एका सैनिकाचे भूत असल्याच्या अफवाही आहेत. येथीस खोली क्रमांक 333 सर्वात भीतीदायक असल्याचे सांगितले जाते. हॉटेलने त्यांच्या वेबसाईटवरही एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्यात एका पर्यटकाला लाईटच्या प्रकाशापासून भूत तयार झाल्याचे दिसले होते.
फोटो : लंडन येथील लँघम होटलचे मेन गेट
पुढील स्लाइड्सवर पाहा हॉटेलमधील काही फोटोज...