आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Young Batsmen Virat Kohli Cheteshwar Pujara Alastair Cook

'भावी सचिन' म्‍हणून पुढे येणारे पाहा जगभरातील हे फलंदाज!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने निवृत्ती घेतल्याने 2013 हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी निराशेचे गेले. गेल्‍या वर्षी नोव्‍हेंबरमध्‍ये सचिनने निवृत्ती घेतली. शेवटी एक दिवस असा येतो, की प्रत्‍येक खेळाडूला मैदान सोडावे लागते. परंतु एखाद्या मोठ्या खेळाडूंच्‍या निवृत्तीनंतर त्‍याची जागा कोण घेईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असते. भारतीय क्रिकेट संघातही काहीशे असेच झाले आहे. सलामीचा फलंदाज विराट कोहली याला 'भावी सचिन' म्हणून पाहिले जात आहे.
सचिनप्रमाणेच ऑस्‍ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग, श्रीलंकेचा कुमार संघकारा, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस यांची जागा कोण घेणार? असा क्रिकेटप्रेमींना प्रश्न पडला असताना नवे चेहरे त्यांची जागा घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज आम्‍ही आपल्याला अशा काही खेळांडूची नावे सांगणार आहोत. त्यांची कामगिरीही सचिन तेंडुलकरच्या दिशेने जाणारी आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या संघात 'भावी सचिन' असेही संबोधले जाते. विशेष म्हणजे या क्रिकेटपटूंचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतापासून ते बांगलादेशपर्यंतचे 'भावी सचिन'...
(टीप: सर्व आकडेवारी 10 जानेवारी 2009 ते 10 जानेवारी 2014 दरम्‍यानची आहे. यामध्‍ये क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय तसेच T-20 प्रकार समाविष्ठ आहेत. सर्व क्रिकेटपटूंचे वय 25 वर्षापेक्षा कमी आहे.)