» Bhajji And Ashwin Rivalar For Participating In First Australia Test

ऑस्‍ट्रेलियाविरूध्‍द होणा-या पहिल्या कसोटीत खेळण्‍यासाठी भज्जी व आश्विनमध्‍ये स्पर्धा

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 06:01 AM IST

  • ऑस्‍ट्रेलियाविरूध्‍द होणा-या पहिल्या कसोटीत खेळण्‍यासाठी भज्जी व आश्विनमध्‍ये स्पर्धा

चेन्नई - भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजनसिंग ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणार आहे. चेन्नई येथे होणा-या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. ही त्याच्या कारकीर्दीतील शंभरावी कसोटी असेल. 99 कसोटीच्या चक्रात अडकलेल्या हरभजनची अंतिम अकरा खेळाडूंत सामील होण्यासाठी दुसरा ऑफस्पिनर आर. अश्विनची स्पर्धा असेल. पर्दापण केले तेव्हापासून अश्विन टीम इंडियाचा स्थायी सदस्य बनलेला आहे.

भारतात झालेल्या दोन सराव सामन्यात अध्यक्षीय संघ आणि भारत अ संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी दुबळी झाली. सुरुवातीला जम्मू-काश्मीरचा ऑफस्पिनर परवेज रसूलने अध्यक्षीय संघाकडून 7 गडी बाद केले. यानंतर दुसया लढतीत डावखुरा फिरकीपटू राकेश धु्रव आणि ऑफस्पिनर जलज सक्सेना यांनी भारत अ संघाकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण केला. धु्रवने सामन्यात एकूण 6, तर जलजने पाच विकेट घेतल्या.

पहिल्या दोन कसोटीसाठी हरभजनची झालेली निवड आश्चर्यकारकच होती. कारण, तो मागच्या रणजीच्या काही सामन्यांत विशेष कामगिरी करू शकला नाही. तरीही राष्‍ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या शानदार कामगिरीवर भरवसा करताना त्याची निवड केली.

रणजी सत्रात हरभजनची सर्वोत्तम कामगिरी सौराष्‍ट्र विरुद्ध 60 धावांत 4 विकेट अशी ठरली. रणजी विजेता मुंबईविरुद्ध शेष भारताकडून खेळताना हरभजनने 64 धावांत 3 आणि 38 धावांत 2 विकेट घेतल्या होत्या.
चांगल्या कामगिरीचा विश्वास
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे. रणजीत माझी कामगिरी चांगली ठरली. आता मालिकेत दमदार प्रदर्शन करून भारताच्या विजयात वाटा उचलायचा आहे, असे कुंबळेनंतर भारताकडून दुसया क्रमांकाचा यशस्वी फिरकीपटू असलेल्या हरभजनने म्हटले आहे.
हरभजनची कसोटी कारकीर्द
कसोटी विकेट डावात सर्वा. सामन्यात सर्वा. सरासरी इकॉ. 5 बळी 10बळी
99 408 8/84 15/217 32.27 2.84 25 05


हरभजनची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी
कसोटी विकेट डावात बेस्ट सामन्यात बेस्ट सरासरी इकॉ. 5 बळी 10बळी
16 90 8/84 15/217 29.35 2.98 07 03

हॅट्ट्रिक
भारतातर्फे कसोटीत पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा मान टर्बनेटर हरभजनला आहे. त्याने 2001 च्या ऐतिहासिक कोलकाता कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. भज्जीमुळे भारत जिंकला होता.

90 विकेट घेतल्या आहेत कांगारूंच्या
भारताच्या 32 वर्षीय हरभजनने 99 कसोटी कारकीर्दीत 32.27 च्या सरासरीने 408 विकेट घेतल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खास यशस्वी ठरला आहे. कांगारूंविरुद्ध त्याने 16 कसोटीत 29.35 च्या सरासरीने 90 विकेट घेतल्या. यात त्याने सात वेळा पाच विकेट आणि तीन वेळा सामन्यात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. या आकडेवारीवरून ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरभजनचे यश अधोरेखीत होते.

चेन्नईच्या मैदानावर घेतल्या 39 विकेट
हरभजनने चेन्नई येथे सहा कसोटीत 39 विकेट घेतल्या आहेत. या मैदानावर एका डावात 84 धावांत 8 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे, तर एका सामन्यात 217 धावांत 15 विकेट ही त्याची चांगली कामगिरी होती.

बॅटनेही दाखविला आहे हिसका
हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 4 अर्धशतके ठोकत 399 धावा काढल्या आहेत.

Next Article

Recommended