आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभजनचा 'दुसरा' आता बॉलिवूडमध्ये; बल्ले-बल्ले करण्यास तयार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला ऑफस्पिनर हरभजनसिंग आता आपला 'दुसरा' बॉलिवूडमध्ये टाकणार आहे. खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून डच्चू मिळालेल्या हरभजनने चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तो लवकरच कॉमेडी पंजाबी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

हरभजनसिंग आज चंदीगड येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाला, मी भारतीय संघात परतेन असा मला विश्वास आहे. मात्र मी पैसे कमविण्यासाठी इतर क्षेत्रातही काम करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर खेळाडू वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे मी ही काहीतरी करावे, असे मला वाटते. त्यातच माझी चित्रपटक्षेत्राशी चांगली जवळीक आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या क्षेत्रात चांगला पैसा मिळतो. त्यामुळे मी हा पर्याय स्वीकारत आहे. याबाबत बॉलिवूड व पंजाबी चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांसोबत माझी चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन चित्रपटांची निर्मिती करणार आहे. हे चित्रपट विनोदी अंगाने जाणारे असून, माझे चित्रपट देश-विदेशातील प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील, असा मला विश्वास आहे.