आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाशी संबंधित व्यक्ती संघटनेत असाव्यात - माकन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - खेळाचा ख-या अर्थाने विकास घडवण्यासाठी संघटनेचीही जबाबदारीही तेवढची महत्त्वाची आहे.यासाठी खेळाशी संबंधी व्यक्तींचाच संघटनेमध्ये समावेश असावा, असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनी मांडले. येथील मैदानावर भारत केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माकन यांच्या हस्ते करण्यात आले. संघटनेचा व्यवहार संबंधित व्यक्तीच्या हातात आल्यास भारत अव्वल दहा देशांमध्ये सहज प्रवेश करेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
‘प्रस्तावित क्रीडा विधेयकामध्ये खेळाडूंसाठी 25 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संघटनेचे व्यवहार पारदर्शक होण्यासाठी विशेष अशा नियमावलीची आवश्यकता आहे. तसेच संघटनेमध्ये वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीची सर्वेसर्वाे म्हणून केली जाणारी निवड चुकीची आहे. त्यामुळे संघटनेसह खेळाचा विकासाची गती कमी होते,’असेही माकन म्हणाले.
माहितीचा अधिकार लागू करावा : खेळाचा विकास रोखणा-या संघटनेचा व्यवहार स्वच्छ होण्यासाठी खेळाला माहितीच्या अधिकारात मोडल्या जाणे, काळाची गरज आहे.