आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत साळुंखे, करुणा वाघमारे ‘भारत श्री’चे मानकरी, सुहास खामकरला पछाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सात वेळचा भारतश्री व आशियाई सुवर्णपदक विजेत्या सुहास खामकरपेक्षा प्रशांत साळुंके हा सरस ठरला. रविवारी त्याने ५५ व्या अखिल भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील भारत श्रीचा मान मिळवला. त्याला ‘इनफील्ड बुलेट’ देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राचीच करुणा वाघमारे (ठाणे) दहाव्या ‘मिस’ भारतची मानकरी ठरली.
फोटो - भारत श्रीसाठी कौशल्य दाखवताना (डावीकडून) प्रशांत साळुंखे, सुहास खामकर.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र पवार यांनी आयोजली होती. विविध वजनी गटातील प्रथम पाच खेळाडूंना १०, ६, ४, ३ व २ हजार तर महिला खेळाडूंना ५, ४, ३, २ व १ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत २७ राज्यांतील ३५० पुरुषांनी व महिला गटात ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातून १० वजनी गटांतून प्रत्येकी १० असे शंभर स्पर्धक मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले. प्रत्येक वजनी गटातून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. १० वजनी गटातून प्रत्येकी १ अशा १० शरीरसौष्ठवपटूंमधून भारत श्रीची निवड करण्यात आली. शरीरसौष्ठवपटूंनी सात कंपलसरी पोझ, संगीताच्या तालावर आणि रॅम्पवर पोझ देत आपल्या शरीराचे प्रदर्शन दाखवताच प्रेक्षकांतून टाळ्यांची दाद मिळत होती.

करुणाने मारली बाजी
महिलांच्या गटात ठाण्याच्या करुणा वाघमारेने सहज बाजी मारली. गुजरातची किरण साबानानी द्वितीय, तर तेलंगणाची सीमा मंडल तृतीय आली. पुण्याची बानू शेख चौथी, तर कोल्हापूरची पूजा पाटील पाचवी आली. फिटनेसमध्ये दिल्लीच्या करिष्मा अरोराने बाजी मारून किताबावर नाव काेरले. यात अन्य चारही खेळाडू पश्चिम बंगालचे आहेत.

पुढील स्पर्धा सोलापूरला अागामी स्पर्धेचे यजमानपद सोलापूरला मिळाले. एप्रिल २०१६ मध्ये अकलूजला स्पर्धा घेणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मोहिते पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे अन्य यश

५५ किलो : संदीप पाटील (द्वितीय), ६५ किलो : संतोष शुक्ला (ठाणे, पाचवा). ७५ किलो : अजिंक्य रेडेकर (कोल्हापूर, पाचवा).
पुढील स्लाइडवर पाहा, करुणाचा फोटो.