आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषकासाठी महेश भूपती- बोपन्नाला डच्चू; लिएंडर पेसची माघार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महेश भूपती व रोहन बोपन्ना या वादग्रस्त जोडीला भारतीय टेनिस संघातून डच्चू देण्यात आला. आगामी डेव्हिस चषकासाठी शनिवारी अखिल भारतीय टेनिस महासंघाने संघाची घोषणा केली. येत्या 14 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ऑलिम्पिकपूर्वी जोडी निवडीवर घातलेला वाद भूपती-बोपन्नाला भलताच महागात पडला. दुखापतीमुळे सोमदेव देववर्मन स्पर्धेत सहभागी होणार नाही. लिएंडर पेसनेदेखील स्पर्धेतून माघार घेतली आहे. या चषकात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. जाहीर झालेल्या संघामध्ये महासंघाने नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. युकी भांबरी, विष्णुवर्धन, सनम सिंग, र्शीराम नारायण स्वामी व साकेत मिनेनीची संघामध्ये वर्णी लागली आहे.
उपांत्य फेरीत प्रवेश: भारतीय टेनिसपटू महेश भूपती-रोहन बोपन्नाने शनिवारी सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या या सहाव्या मानांकित जोडीने पुरुष दुहेरीने उपांत्यपूर्व सामन्यात पोलंडच्या मारियस फायरेस्टेनबर्ग-मार्सनि मैतकोव्सकीवर 6-4, 3-6, 10-8 ने विजय मिळवला.
आक्रमक सर्व्हिसचे प्रदर्शन करत भूपती-बोपन्नाने अवघ्या 73 मिनिटांमध्ये धडाकेबाज विजयाची नोंद करत सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला. दमदार सुरुवात करत भारताच्या जोडीने पहिला सेट 6-4 ने जिंकून आघाडी मिळवली. पोलंडच्या जोडीने दुसरा सेट 6-3 ने जिंकून बरोबरी मिळवली. मात्र, भूपती-बोपन्नाने तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये 10-8 ने बाजी मारून उपांत्य फेरीत धडक मारली.
फेडररने मार्डीला नमवले : अव्वल मानांकित रॉजर फेडररने शनिवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला. अमेरिकेच्या मार्डी फिशला दोन सेटमध्ये पराभूत करून फेडररने स्पर्धेतील आव्हान राखून ठेवले. फेडररने हा सामना 6-3, 7-6 ने जिंकला. या वेळी हा सामना अधिकच रंगतदार पद्धतीने खेळवला गेला. फेडररने सरस कामगिरी करत सामना खिश्यात घातला.
ली ना, व्हीनसची आघाडी;सेरेना बाहेर
सिनसिनाटी- महिला गटात फ्रेंच ओपन चॅम्पियन ली ना व अमेरिकेची स्टार टेनिसपटू व्हीनस विल्यम्सने स्पर्धेत आघाडी मिळवली. चीनच्या ली ना हिने महिला एकेरीच्या लढतीत अव्वल मानांकित रंदवास्काला 6-1, 6-1 ने धूळ चारली. दुसर्‍या एका सामन्यात व्हीनसने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरवर 6-2, 6-7,6-4 ने मात केली. उपांत्य सामन्यात ली नाची गाठ व्हीनसशी पडणार आहे. त्यामुळे हा सामना अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
सेरेनाची विजयी मालिका खंडित : मागील वर्षभरापासून सलग विजयाची सुरू असलेली सेरेना विल्यम्सची विजयी मालिका शनिवारी खंडित झाली. तिने 19 विजयाची नोंद करत विजयाचा सिलसिला अबाधित ठेवला होता.
मात्र, अव्वल मानांकित टेनिसपटू अंगोलिक केर्बरने तिला सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-4 ने पराभूत केले. उपांत्य सामन्यात केर्बरला चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पहिल्या सेटमधील निराशाजनक कामगिरीतून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेरेनाला शेवटच्या मिनिटापर्यंत यश गवसले नाही. मात्र, तिने त्यासाठीची जिद्द सोडली नाही.