आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूषण नावंदे इंग्लंडमध्ये खेळणार क्लब क्रिकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी इंग्लंडला रवाना होत आहे. त्याने इंग्लंडमधील मिडास टच क्रिकेट क्लबशी नुकताच करार केला आहे. या 20 दिवसांच्या दौर्‍यात तो विविध क्लबविरुद्ध एकूण 18 लढतीत खेळेल. या दौर्‍यात पांडुरंग इंगुलीकर आणि आशिष चव्हाण त्याचे समन्वयक आहेत. नुकत्याच झालेल्या डीपीएल क्रिकेट स्पर्धेत तो सियाराम्स इलेव्हन संघाकडून खेळला होता. तो गेल्या वर्षभरापासून पुण्यातील रांजणे अकादमीत, नेहरू स्टेडियमवर क्रिकेटचे धडे गिरवत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ छायात्रिकार भीमाशंकर नावंदे यांचा तो मुलगा आहे. या दौर्‍यासाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.