आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवनेश्वरला क्रिकेटप्रेमींचा ‘पीपल्स चॉइस’ पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा प्रख्यात जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला एलजीचा ‘पीपल्स चॉइस’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या त्याने डेल स्टेन आणि मिशेल जॉन्सन यांना मागे टाकले.

इंग्लंडची महिला संघाची कप्तान शॉरलेट एडवर्ड आणि श्रीलंकेचा कप्तान अँजेलो मॅथ्यूजदेखील या स्पर्धेत होते. हा पुरस्कार पटकावणारा भुवनेश्वर कुमार हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर (२०१०) आणि महेंद्रसिंग धोनी (२०१३) यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, तर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने २०११ आणि १२ अशी सलग दोन वर्षे हा पुरस्कार पटकावला होता. दरम्यान, क्रिकेटप्रेमींनी दाखवलेल्या प्रेमाबाबत भुवनेश्वर कुमारने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

क्रिकेटप्रेमींच्या व्होटमुळे मला पीपल चॉइस अवॉर्ड मिळाला आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी फार मौल्यवान आहे. हा पुरस्कार माझ्या कामगिरीमुळे नव्हे तर लोकांच्या प्रेमापोटी मिळाला आहे. भुवनेश्वर कुमार.