आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पोर्ट ऑफ स्पेन- श्रीलंकेविरूद्धच्या विजयात महत्वाची भुमिका निभावलेला स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. कॅरेबियन विकेटवर अवघ्या आठ धावांमध्ये चार विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भुवनेश्वरने लेगस्पिनर अमित मिश्राचा 31 धावांवर चार विकेटची कामगिरी मागे टाकली. मिश्राने आठ जून 2011 रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथेच ही कामगिरी केली होती. उल्लेखनीय म्हणजे भुवनेश्वरनेही इथेच मिश्राचा हा विक्रम मोडला.
भुवनेश्वरच्या शानदार कामगिरीमुळे भारताने श्रीलंकेला पराभूत करून तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत जागा बनवली. भुवनेश्वरचीही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. 15 जानेवारी 2013 रोजी कोची येथे इंग्लंड संघाविरोधात 29 धावांत तीन विकेट ही भुवनेश्वर कुमारची सर्वोच्च कामगिरी होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.