आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhuvneshwar Kumar Father Fumes Over Champagne In England, News In Marathi

मॅन ऑफ द सीरीज' ठरलेल्‍या भूवनेश्‍वरकुमारला शॅम्‍पेन बक्षीस मिळताच नाराज झाले वडील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - भूवनेश्‍वर कुमारचे वडील किरण पाल सिंह)
मेरठ - भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज भुवननेश्‍वरला बक्षीस स्‍वरुपात शॅम्‍पेन मिळाल्‍याने त्‍याचे वडील किरण पाल सिंह यांनी जाहीर नाराजी व्‍यक्‍त केली. इंग्‍लंड विरुद खेळल्‍या गेलेल्‍या कसोटीमालिकेमध्‍ये भुवनेश्‍वर कुमारला 'मॅन ऑफ द सीरीज' हा पुरस्‍कार मिळाला होता.
प्रेझेंटेशन सेरेमनीमध्‍ये सर्व विजेत्‍या खेळाडूंना शॅम्‍पेन दिली जात होती. भूवनेश्‍वरचे वडील म्‍हणाले की, ''मी टीव्‍हीवर प्रेझेंटेशन सेरेमनी पाहत होतो. त्‍यावेळी प्रत्‍येक विजेत्‍याला शॅम्‍पेन दिली जात होती. माझा मुलगा मद्य घेत नाही. अशा वेळी खेळाडूला शॅम्‍पेन भेट देणे हे चूकीचे आहे. माझा मुलगा पराभवामूळे ओशाळलेला दिसत होता''

भुवनेश्‍वरचे वडील माजी पोलिस इन्‍पेक्‍टर आहेत. त्‍यांनी स्‍वेच्‍छा निवृत्‍ती घेतली आहे.
भुवनेश्‍वरच्‍या बहीणीने म्‍हटले आहे की, '' भुवी कधीच वाइन घेत नाही. परंतु सन्‍मान म्‍हणून त्‍याने ती स्विकारली असेल. तो ती मित्रांना भेट देईल किंवा एक आठवण म्‍हणून आलमारीमध्‍ये ठेवू शकतो.''
इंग्‍लंडमध्‍ये आहे परंपरा
शॅम्‍पेनच्‍या बॉटलमुळे उठलेल्‍या चर्चेवर इंग्‍लंड क्रिकेट बोर्डाने म्‍हटले आहे की, 'शॅम्‍पेनच्‍या बॉटल सामन्‍याचे स्‍पॉंन्‍सर देत असतात.शॅम्‍पेन भेट देणे ही इंग्‍लंडची परंपरासुध्‍दा आहे.'
गिब्‍सन याने म्‍हटले आहे की, 'शॅम्‍पेन भेट देण्‍याचे प्रथा ऑस्‍ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्‍ट इंडीज, न्‍यूझीलंड आणि काही आयसीसी इव्‍हेंट्समध्‍ये देण्‍याची प्रथा आहे.' भारतातील स्‍पॉन्‍सर अधिकतर मोटारबाइक भेट देतात.
'शॅम्‍पेन देण्‍याची सुरुवात ऑस्‍ट्रेलियापासून सुरु झाली असून तेथे एकदिवसीय विजेत्‍यांना शॅम्‍पेन भेट दिल्‍या जात होती' असे मोहनदास मेनन यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भुवनेश्‍वर कुमारची काही खास छायाचित्रे..