आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B Support Yuvraj Singh Cricket News In Marathi

युवीला ‘अग्निपथा’वर बिग बीचा पाठिंबा; चाहत्यांचा असंतोष कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेट विश्वातील महानायक सचिनपाठोपाठच आता रुपेरी पडद्यावरचे बिग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील युवराजसिंगच्या पाठिंब्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनीही ट्विट करून युवीविरुद्ध उफाळलेला असंतोष चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमधील भारताच्या पराभवास युवराज जबाबदार असल्याचा असंतोष अद्यापही कायम आहे. यात युवीला पाठिंबा देण्यासाठी चक्क महानायक अमिताभ बच्चनसह अवघे बॉलीवूड मैदानात उतरले आहे.
वर्ल्डकपच्या श्रीलंकेने भारताचा पराभव केला. या पराभवाला युवराजसिंग जबाबदार असल्याच्या टीकेची झोड उठत आहे. अंतिम सामन्यात युवराजकडून झालेल्या संथ खेळीने काही नागरिकांनी त्याच्या घरावर दगडफेक केली असतानाच बॉलीवूड मात्र युवराजच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे.
युवीची कामगिरी
०19 वर्षांखालील विश्वचषक 2000
मॅन ऑफ द सिरीज : युवराज

०2007 टी-20 वर्ल्डकप विजेता : भारत
बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट : युवराज

०2011 विश्वचषक (वनडे) विजेता : भारत
मॅन ऑफ द सिरीज : युवराज
पुढील स्लाइडमध्ये, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते