आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Big B To Make Commentary Debut At Pakistan India World Cup Clash

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-पाक मॅच, बिग बींची कॉमेंट्री! टर्म्स अचूक उच्चारण्याचा सराव सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना... अन् कॉमेंट्रीला साक्षात बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन! येत्या १५ रोजी हा अभूतपूर्व योग जुळून येणार आहे. सिनेमा क्रिकेट या दोन गोष्टींनी भारतीय मनांवर गारूड केलेले आहे. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित प्रत्यय बिग बींच्या आवाजातील धावत्या समालोचनाने रसिकांना येणार आहे.

केबीसीमध्ये "देवियों और सज्जनों' असे म्हणत दमदार आवाजाने रसिकमनाचा ठाव घेणारे अमिताभ सध्या क्रिकेटमधील टर्म्स अचूकपणे वापरण्याचा सराव करत आहेत. हर्षा भोगले कपिल पाजींकडून ते बऱ्याच टिप्सही घेत आहेत. आर. बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा फंडा अवलंबवण्यात येत आहे. विश्वचषकाच्या आठवडाभर आधी तो प्रदर्शित होईल.

कशासाठी... प्रचारासाठी : बिगबींच्या समालोचनने भारत-पाक सामन्याच्या लोकप्रियतेचा ‘शमिताभ’ या चित्रपटाच्या प्रचारासाठी उपयोग करून घेतला जाणार आहे.
पुढे वाचा, चार दशकांपूर्वी झाले होते रिजेक्ट...