आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन, पाँटिंगसह स्टार स्टाफ काय करतोय ? मुंबईला एकही सामना जिंकण्यात यश नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई | आयपीएलच्या आठव्या मोसमात मंुबई इंडियन्सकडे स्टार खेळाडूंचा सहकारी स्टाफ बघून अन्य कोणत्याही संघाचा जळफळाट होऊ शकतो. मात्र, हा दिग्गज स्टाफ अजून तरी मुंबईसाठी लाभदायक सिद्ध झाला नाही.
मुंबईला सलग तीन सामन्यांत दणका बसला. ज्या संघासोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आॅस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पाँटिंग, महान लेगस्पिनर अनिल कुंबळे, शेन बाँड, जाॅन राइट, जाँटी ऱ्होड्स, भारताचा जाँटी नावाने प्रसिद्ध राॅबिनसिंग, माजी यष्टिरक्षक किरण मोरे, पारस महांब्रे आणि माजी फिरकीपटू राहुल संघवीसारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत.