आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे : तब्‍बल 13 वर्षांनी दोन्ही सलामीवीरांची शतके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटक - भारताने श्रीलंकेविरुद्ध सामन्यांच्या मालिकेतील पहिली वनडे 159 धावांनी जिंकली. ही भारताची विश्वचषकाआधीची तयारी असल्याचे समजले जात आहे. विश्वचषक 14 फेब्रुवारी 2015 पासून सुरू होईल.
रहाणे-धवनने गाजवला दिवस
भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी एकत्र शतक ठोकण्याची ही तिसरी वेळ ठरली. यापूर्वी सौरव आणि सचिन तेंडुलकर यांनी हा पराक्रम दोन वेळा केला. घरच्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या बाराबती स्टेडियमवर श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले. लंकेचा कर्णधार मॅथ्यूजचा हा निर्णय चुकलाच. भारताची सलामी जोडी रहाणे आणि धवन यांनी तब्बल 231 धावांची सलामी देऊन श्रीलंकेच्या गोलंदाजीची हवाच काढून टाकली. रहाणेने 108 चेंडूंत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 111 धावा ठोकल्या. दुसरीकडे धवननेसुद्धा आपल्या जबरदस्त फॉर्मचे उदाहरण सिद्ध करताना 107 चेंडूंत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 113 धावा चोपल्या. तिस-या क्रमांकावर आलेल्या सुरेश रैनानेसुद्धा प्रेक्षकांना निराश केले नाही. रैनाने अवघ्या 34 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. धोनीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणा-या कोहलीने 21 चेंडूंत 2 चौकार खेचत 22 धावा काढल्या. अंबाती रायडूने 27 धावांचे योगदान दिले. वृद्धिमान साहाने नाबाद 10 व अक्षर पटेलने नाबाद 14 धावा काढल्या.
*ईशांत : 4 विकेट
*भारत : 363/5 *श्रीलंका : 194
शिखर धवन
*रन 113*चेंडू 107
*चौकार 14 *षटकार 3
अजिंक्य रहाणे
*धावा111 *चेंडू108
*चौकार13 *षटकार 2
पुढील स्‍लाइडवर वाचा, याआधीचा विक्रम आहे सचिन-गांगुलीच्‍या नावे ...