आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birth Day Spl : Wwe Reseller Undertaker Latest News In Marathi

B\'DAY SPL: मृत्‍यूलाच चकविणारा महाकाय अंडरटेकर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूई या खेळाला सर्वचजण जाणतात. मनोरंजनाच्‍या या आधुनिक खेळात कित्‍येक पैलवानांना आपल्‍या प्राणाला मुकावे लागले आहे. 'डेडमॅन' नावाने प्रसिध्‍द असलेला अंडरटेकरचा आज वाढदिवस आहे. अंडरटेकरचे असली नाव मार्क विलियम कॅलावे आहे. त्‍याचा जन्‍म 24 मार्च 1965 रोजी झाला.

सहा फुट नऊ इंच देहयष्‍टी असणा-या अंडरटेकरने डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूई स्‍पर्धेतील मानिया टूर्नांमेंटमध्‍ये सलग 21 सामने जिंकण्‍याचा पराक्रम केला आहे.

का म्‍हणतात डेडमॅन?
अंडरटेकर डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूई मधील स्‍पर्धेत कित्‍येक वेळ कोमात गेला होता. परंतु या महान रेसलरने मृत्‍यूलाच हुलकावणी दिली आहे. दु:खातून सावरून कित्‍येक वेळेस त्‍याने जोरदार पुनरागमन करत विरोधी स्‍पर्धकांना धूळ चारली. त्‍याच्‍या रौद्ररुपाला पाहताच छोटे- मोठे रेसलर त्‍याच्‍या जवळसुध्‍दा फिरकत नसत.

डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूईमध्‍ये राहिलेले प्रदर्शन आणि किताब
1 डेडमॅन म्‍हणून प्रसिध्‍द असलेल्‍या अंडरटेकर आठ वेळेस डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूई चा चॅम्पियन होण्‍याचा बहूमान पटकाविला.
2 सलग तीन वेळ जागतीक जास्‍त वजनी गटात चॅम्पियन चा किताब आपल्‍या नावे केला.
3 'ब्रदर ऑफ डिस्‍ट्रकरस्‍न' मध्‍ये आपल्‍या सावत्र भावासमवेत सात वेळेस टॅग टीम चॅम्पियन होण्‍याचा मान मिळविला.
4 एकवेळ तो डब्‍ल्‍यूसीडब्‍ल्‍यूई जागतिक टॅग टीम टुर्नामेंटचा चॅम्पियन राहिला.
5 अंडरटेकरने 'रॉयल रूम्‍बल' हा शेवटचा किताब जिंकला.

आवडता खेळ बास्‍केटबॉल
खूप कमी लोकांना माहिती असेल, की अंडरटेकर शाळेमध्‍ये असताना बास्‍केटबॉल खेळायचा. 1985- 86 दरम्‍यान टेक्‍सास वेस्लियन विद्यापीठाकडून त्‍याने काही मोठ्या स्‍पर्धेत सहभाग नोंदवला होता.

खलीला चारली धूळ
अंडरटेकर आणि भारतीय पैलवान खली यांच्‍यामध्‍ये होणा-या सामन्‍याची प्रेक्षकांमध्‍ये उत्‍कंठा लागलेली असायची. कारण दोघेही हार मान्‍य करायला तयार नसत. लढतीदरम्‍यान अनेकदा अंडरटेकरने खलीला पराभूत केले.

अंडरटेकरने हॉलीवूड चित्रपटातही काम केले आहे. 1991 मध्‍ये आलेल्‍या 'सुबर्बन कमांडो' मध्‍ये त्‍याने अभिनेत्‍याची भूमिका केली. 'बियॉन्‍ड द मॅट' हा त्‍याचा दुसरा चित्रपट होता.
पॉलेटग्रेस्‍ट: द लेजेसी, डाऊनटाऊन, सेलिब्रिटी डेथमॅच टीव्‍ही शोमध्‍येही त्‍याने काम केले.

टोपननावे
1 द फेनोम
2 द डेडमॅन
3 द लॉर्ड ऑफ डार्कनेस
4 द अमेरिकन बॅड-एस
5 द रेड डेविल
6 बिग एविल
7 द डेमोन ऑफ डेथ वॅली

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, अंडरटेकरची काही भन्‍नाट छायाचित्रे...