आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special Cricketer Sandeep Patil Latest News In Marathi

B\'DAY: विश्‍वचषकातील \'हीरो\' संदीप पाटीलने पूनम ढिल्‍लोसोबत केले होते चित्रपटात काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइलफोटो - एका दृश्‍यामध्‍ये बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्‍लो आणि संदीप पाटील)
कपिल देवच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने पहिला वहिला क्रिकेट विश्‍वचषक जिंकला. त्‍या संघातील सदस्‍य राहिलेले संदीप पाटील यांनी काल (18 ऑगस्‍ट) रोजी वाढदिवस साजरा केला आहे. संदीप पाटील सध्‍या भारतीय संघाचे निवड समितीचे मुख्‍य आहेत. ते एक उत्‍कृष्‍ट क्रिकेटपटूबरोबरच अभिनेतेसुध्‍दा होते. त्‍यांनी पुनम ढिल्‍लोसोबत काही चित्रपटांमध्‍ये काम केले आहे.
8 सामन्‍यात केल्‍या होत्‍या 216 धावा
मधल्‍या फळीतील फलंदाज म्‍हणून संदीप पाटीलांना ओळखले जात होते. ते एक आक्रमक फलंदाज होते. संदीप पाटलांनी विश्‍वचषकांमध्‍ये महत्‍वाची भूमिका बजावली होती. त्‍यामध्‍ये 8 सामन्‍यांमध्‍ये 30.85 च्‍या सरासरीने त्‍यानी 216 धावा केल्‍या होत्‍या.

1983 च्‍या विश्‍वचषकात सर्वांधीक धावा काढणारे भारतीय फलंदाज

* कपिल देवने 303 धावा काढल्‍या त्‍याचा बेस्ट स्कोर नाबाद 175 धावा आहेत.
* यशपाल शर्माने 240 धावा काढल्‍या त्‍याचा बेस्ट स्कोर 89 धावा आहेत.
* मोहिंदर अमरनाथने 237 धावा काढल्‍या त्‍याचा बेस्ट स्कोर 80 धावा आहेत.
* संदीप पाटीलने 216 धावा काढल्‍या त्‍याचा बेस्ट स्कोर नाबाद 51 धावा आहेत.
* कृष्णामचारी श्रीकांतने 156 धावा काढल्‍या त्‍याचा बेस्ट स्कोर 39 धावा आहेत.

पूनम ढिल्‍लोसोबत ऑन स्‍क्रीन जोडी
दिग्‍गज क्रिकेटपटूमध्‍ये सा‍मील असलेला संदीप पाटीलने तत्‍कालीन बहुचर्चित अभिनेत्री पूनम ढिल्‍ला सोबत 'कभी अजनबी थे' या चित्रपटात काम केले. त्‍यामध्‍ये त्‍याने मुख्‍य भूमिका साकारली. त्‍यानंतर मात्र त्‍याने चित्रपटात काम केले नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संदीप पाटलांची काही निवडक छायाचित्रे..